📝 *प्रश्न : १ ला* 📝
*पुढील दिलेल्या पर्यायांतील कोणती व्यक्ती ही भारतीय निवडणूक आयोगाचे निवडणूक आयुक्त नाही ?*
A) ए.के.जोती
B) जी.एस.गर्ग
C) नसीम झैदी
D) ओ.पी.रावत
अचूक पर्याय - B
📝 *प्रश्न : २ रा* 📝
*भारताचे नवनियुक्त सरन्यायाधीश जे.एस.केहर यांच्याबाबतीतले विधाने वाचा.*
1) न्या.जे.एस.केहर हे भारताचे ४५ वे सरन्यायाधीश आहेत.
2) जन्माने भारतीय नसलेले ते पहिले न्यायाधीश/सरन्यायाधीश आहेत.
3) शीख समाजातील ते पहिले सरन्यायाधीश आहेत.
4) गेली ४० वर्ष ते तीन महिन्यातून एकदा रक्तदान करतात.
वरील विधाने वाचून असत्य विधान/ विधाने असलेला पर्याय निवडा.
A) सर्व बरोबर
B) फक्त 2 व 4
C) फक्त 1
D) फक्त 3 व 4
अचूक पर्याय - C
📝 *प्रश्न : ३ रा* 📝
1) जे.जयललिता यांनी बालकलाकार म्हणून तेलगू चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या.
2) ' वेन्निरा आदाई ' हा तामीळी चित्रपट नायीकेची भूमिका असलेला त्यांचा पहिला चित्रपट आहे.
3) त्या जन्माने द्रावीडी वंशाच्या होत्या.
4) त्यांनी तब्बल सहा वेळा तामीळनाडूचे मुख्यमंत्रीपद आपल्या ताब्यात आणले.
*वरील विधाने वाचून बरोबर विधान/विधाने असलेला पर्याय निवडा.*
A) फक्त 2 व 4
B) फक्त 1 व 3
C) फक्त 1, 3 व 4
D) सर्व बरोबर
अचूक पर्याय - A
📝 *प्रश्न : ४ था* 📝
*जेष्ठ पत्रकार, अभिनेता,टीकाकार व राजकारणी चो रामास्वामी यांच्या संदर्भातील विधाने वाचा.*
1) त्यांचे मूळ नाव श्रीनिवास अय्यर रामास्वामी असे होते.
2) त्यांनी कन्नड भाषेमध्ये 'तुघलक ' मासिक काढले होते.
3) त्यांनी आणीबाणीला विरोध करण्यासाठी ' मोहमंद बिन तुघलक ' या चित्रपटाची कथा लिहून त्यात अभिनय केला होता.
4) त्यांचे निधन ७ डिसेंबर २०१६ रोजी झाले.
वरील विधाने वाचून योग्य विधान/विधाने असलेला पर्याय निवडा?
A) फक्त 1, 3 व 4
B) सर्व बरोबर
C) फक्त 2
D) फक्त 1 व 4
अचूक पर्याय - A
मासीक तामीळ भाषेमध्ये
📝 *प्रश्न : ५ वा* 📝
*महाराष्ट्र केसरी पहिलवान विजय चौधरी यांच्या बाबतीतील विधाने वाचा .*
1) विजय चौधरी हा 'महाराष्ट्र केसरी' ची हॅटट्रीक करणारा तिसरा मल्ल आहे.
2) त्याने पुण्याच्या अभिजीत कटकेचा पराभव केला.
3) यावर्षी त्याने ६१ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत ' महाराष्ट्र केसरी ' हा किताब पटकावला.
4) विजय चौधरी हा जळगाव जिह्याचा रहिवासी आहे.
*वरील विधाने वाचून योग्य विधान / विधाने असलेला पर्याय निवडा .*
A) सर्व बरोबर
B) फक्त 2 व 4
C) फक्त 1 व 3
D) फक्त 2, 3 व 4
अचूक पर्याय - B
दुसरा मल्ल व ६० वी स्पर्धा
📝 *प्रश्न : ६ वा* 📝
*अखील भारतीय साहित्य संम्मेलनासंदर्भातील विधाने वाचा.*
1) डॉ.अक्षयकुमार काळे यांची ९० व्या अखील भारतीय साहित्य संम्मेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
2) ९० वे साहित्य संमेलन हे डोंबिवली येथे भरणार आहे.
3) संम्मेलनाध्यक्षपदाचा सन्मान मिळविणारे डॉ.अक्षयकुमार काळे हे आठवे नागपूरकर साहित्यिक आहेत.
4) सध्या अखील भारतीय साहित्य महामंडळाचे कार्यालय सध्या नागपुरात विदर्भ साहित्य संघाकडे आहे.
*वरील विधाने वाचून चूकीचे विधान / विधाने असलेला पर्याय निवडा.*
A) फक्त 3 व 4
B) फक्त 1 , 2 व 3
C) फक्त 4
D) कोणतेही नाही.
अचूक पर्याय - D
📝 *प्रश्न : ७ वा* 📝
*खालील विधाने वाचून चुकीचे विधान असलेला पर्याय निवडा*
A) आय.एस.आय.ही पाकीस्थानची शक्तीशाली गुप्तचर संघटना आहे.
B) कमर जावेद बाजवा हे पाकीस्थानचे लष्करप्रमुख आहेत.
C) लेफ्टनंट जनरल नावीद मुख्तार यांची पाकीस्थानच्या पंतप्रधानांनी आय.एस.आय.प्रमुख म्हणून नेमणूक केली.
D) आय.एस.आय.प्रमुखांची नेमणूक करण्याचे अधिकार पाकिस्थानच्या लष्करप्रमुखांना असतात.
अचूक पर्याय - C
📝 *प्रश्न : ८ वा* 📝
*संयुक्त राष्ट्रसंघातील ( UNO) भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी कोण आहेत ?*
A) अनिरुद्ध राजपूत
B) एम.एन.शर्मा
C) इशात हुशैन
D) सईद अकबरुद्दीन
अचूक पर्याय - D
📝 *प्रश्न : ९ वा* 📝
' *एक छोटा माणूस ' हे आत्मचरित्र कोणत्या नाट्यरंगकर्मीचे आहे ?*
A) विजय तेंडूलकर
B) काशीनाथ घाणेकर
C) जयंत सावरकर
D) शं.ना.नवरे
अचूक पर्याय - C
जयंत सावरकर ९७ व्या नाटयसंम्मेलनाचे नियोजित अध्यक्ष
📝 *प्रश्न : १० वा* 📝
*अमेरिकन नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संदर्भातील विधाने वाचा.*
1) ते रिपब्लीकन पक्षाचे असून ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले.
2) ते ७० वर्षाचे असून २० जानेवारी २०१७ ला राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत.
3) प्रशासनाचा कुठलाही अनुभव नसणारे ते ६० वर्षातील पहिले अननुभवी राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत.
4) ट्रम्प हे अमेरिकेच्या आतापर्यंतच्या राष्ट्राध्यक्षांपैकी सर्वांत वृद्ध राष्ट्राध्यक्ष असतील.
*वरिल विधाने वाचून योग्य विधान/विधाने असलेला पर्याय निवडा.*
A) सर्व बरोबर
B) फक्त 1, 2 व 3.
C) फक्त 2 , 3 व 4
D) फक्त 3 व 4.
अचूक पर्याय - C
ट्रम्प ४५ वे राष्ट्राध्यक्ष.
🏹🎯 *जे.पी.प्रश्न* 🎯🏹
_*८९ व्या ऑस्कर पुरस्कारासाठी ए.आर.रहमानला कोणत्या चित्रपटाच्या संगीतासाठी नामांकन मिळाले आहे ?*_
🌹🔵 *जे.पी.अचूक उत्तर* 🔵🌹
_*पेले: बर्थ ऑफ ए लिजेंड*_
oakley titanium sunglasses - Titanium Art - Tatian Art
ReplyDeleteBuy titanium mens ring the mens titanium rings T-Tinanium-Art at titanium quartz meaning TITNAL ART today. iron titanium token Take advantage of our great titanium wheels selection of stunning glass pieces from TITNAL ART.