Friday, 15 April 2016

[15/04 9:00 PM] बाळराजे राठोड सर: 1)जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याविषयी पुढील विधानांचा विचार करून योग्य विधाने ओळखा.

1.त्या पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या (PDP) अध्यक्षा आहेत.
2.त्या जम्मू काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत.
3.त्या देशातील पहिल्या मुस्लीम मुख्यमंत्री ठरल्या आहेत.


A.फक्त 1,2

B.फक्त 1,3

C.1,2,3

D.एकही नाही
[15/04 9:01 PM] बाळराजे राठोड सर: A✅✅✅
मेहबूबा मुफ्ती या जम्मू काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरल्या असून देशातील दुसऱ्या मुस्लीम महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत,या अगोदर सईदा अन्वरा तैमुर यांनी आसामचे मुख्यमंत्री पद भूषविले आहे.
[15/04 9:02 PM] बाळराजे राठोड सर: 2)पुढील योग्य विधानांचा विचार करा.

1.बिहार मध्ये नुकतीच दारू वर पूर्ण बंदी घालण्यात आली.
2.असा निर्णय घेणारे बिहार हे देशातील पहिलेच राज्य आहे.


A.फक्त 1
B.फक्त 2
C.1 व 2
D.एकही नाही
[15/04 9:02 PM] बाळराजे राठोड सर: A✅✅✅
बिहारमध्ये 1 एप्रिल 2016 पासून संपूर्ण दारू बंदी करण्यात आली आहे.असा निर्णय लागू करणारे बिहार हे गुजरात ,नागालँड,मिझोरम नंतर चौथे राज्य ठरले आहे.
[15/04 9:03 PM] बाळराजे राठोड सर: 3)योग्य पर्याय निवडा ?

1.एक व्यक्ती राज्यसभा / लोकसभा / विधानसभा / विधानपरिषद  निवडणुकीसाठी किमान 2 मतदार संघातून उभा राहू शकतो.

2.केंद्रीय निवडणूक आयोग राज्यातील  विधानसभा व विधानपरिषदा यांच्या निवडणुका घेऊ शकतो.

3.1962 पासून एकसदसीय मतदार संघ करण्यात आला.

4.MPSC च्या अध्यक्ष व सदस्यांना दूर करण्याचा अधिकार राज्यपालांना असतो.

A.1 व 4
B.2 व 3
C.सर्व बरोबर
D.1, 2 व 3
[15/04 9:04 PM] बाळराजे राठोड सर: B✅✅✅
एक व्यक्ती राज्यसभा / लोकसभा / विधानसभा / विधानपरिषद निवडणुकीसाठी जास्तीत जास्त म्हणजेच कमाल 2 मतदार संघातून उभा राहू शकतो.केंद्रीय निवडणूक आयोग -राज्यसभा / लोकसभा / विधानसभा / विधानपरिषद यांच्या निवडणुका घेतो.MPSC अध्यक्ष व सदस्य - निवड राज्यपालामार्फत - पदयुती - राष्ट्रपतीमार्फत होते.
[15/04 9:04 PM] बाळराजे राठोड सर: 5)व्यभिचार हा गुन्हा कोणाविरुद्ध नोंदविता येत नाही .

A. नवरा
B.बायको
C.दोन्ही
D.यापैकी नाही
[15/04 9:05 PM] बाळराजे राठोड सर: B✅✅✅
[15/04 9:06 PM] बाळराजे राठोड सर: 4)खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस मंत्री बनवता येते?

1.विधानसभेचा निर्वाचित किंवा नामनिर्देशित सदस्य

2.विधानपरिषदेचा निर्वाचित किंवा नामनिर्देशित सदस्य

3.विधानसभेचा फक्त निर्वाचित सदस्य

4.विधानपरिषदेचा फक्त निर्वाचित सदस्य


A.1, 2 व 3
B.2, 3 व 4
C.फक्त 2 व 4
D.फक्त 1 व 2
[15/04 9:07 PM] बाळराजे राठोड सर: D✅✅✅
राज्य विधानसभा किंवा लोकसभेचा कोणताही सदस्य म्हणजेच निर्वाचित / नामनिर्देशित याला मंत्री बनवता येते.

- विधानसभा / विधानपरिषदेचा सदस्य नसलेला व्यक्तीसुद्धा मंत्री बनवता येतो मात्र त्याला 6 महिन्यांच्या आत कोणत्याही एका सभागृहाचे सदस्यत्व मिळवावे लागते.
[15/04 9:08 PM] बाळराजे राठोड सर: 6)सी.आर.पी.सी च्या कलम 95 मधील जप्तीची घोषणा कोण रद्द करेल ?

A.दंडाधिकारी
B.मुख्य न्याय दंडाधिकारी
C.सत्र न्यायालय
D.उच्च न्यायालय
[15/04 9:09 PM] बाळराजे राठोड सर: D✅✅✅
[15/04 9:09 PM] बाळराजे राठोड सर: 7)कार्टाजेना कराराचे मुख्य उद्दिष्ट कोणते ?

A.जनुकीय संशोधित जीवांचे एका देशातून दुसऱ्या देशात होणाऱ्या स्थानांतराचे नियंत्रण करणे
B.जैवविविधतेचे संरक्षण करणे
C.जनुकीय संसाधने हि स्थानिक जनसमुदायाच्या मालकीची असतात ते मान्य करणे
D.वन्यजीवांचे संरक्षण करणे
[15/04 9:10 PM] बाळराजे राठोड सर: A✅✅✅
विविध जीवप्रजातींद्वारे निर्मित जनुकीय संसाधने हि स्थानिक जनसमुदायाच्या मालकीची असतात.  हे मान्य करणारा करार नागोया करार म्हणून ओळखतात आणि कार्टाजेना करार संशोधित जीवांचे आंतरदेशीय स्थलांतरण नियंत्रित करतो.  हा करार 2003 मध्ये अंमलात आला.
[15/04 9:11 PM] बाळराजे राठोड सर: 8)खालील विधाने लाक्षत घ्या ?

1.पी. ए. एन. (Peroxyacetyl Nitrate), ओझोन, स्माॅग ही प्राथमिक प्रदूषके आहेत.
2.सल्फर डाय ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साइड ही द्वितीयक प्रदूषके आहेत

A.1 चूक 2 बरोबर

B.1 बरोबर 2 चूक

C.दोन्ही चूक

D.दोन्ही बरोबर
[15/04 9:12 PM] बाळराजे राठोड सर: C✅✅✅
सल्फर डाय ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साइड ही प्राथमिक  प्रदूषके आहेत त्यांची विल्हेवाट त्यांच्या उगमापासून सरळ वातावरणात लावली जाते. त्यांच्यात काही बदल घडून आलेले नसतात तसेच ते दुसऱ्या प्रकारात रुपांतरीत झालेले नसतात. पी. ए. एन. (Peroxyacetyl Nitrate), ओझोन, स्माॅग ही द्वितीयक प्रदूषके आहेत. कारण प्राथमिक प्रदुषकांवर रासायनिक प्रक्रियानंतर त्याची निर्मिती होते.
[15/04 9:12 PM] बाळराजे राठोड सर: 9)खालीलपैकी कोणी 'विज्ञानिक गुन्हा अन्वेषण लोकप्रिय केले ?

A सर आर्थर कॉनॅन डॉयल

B केलविन गोडार्ड

C अल्फान्सो बर्टीलॉन

D डॉ.लिऑन लेट्स
[15/04 9:13 PM] बाळराजे राठोड सर: A✅✅✅
[15/04 9:13 PM] बाळराजे राठोड सर: 10)विमान अपघात ,वादळ आणि भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीला बळी पडलेल्या ओळख कोणत्या पद्धतीने करतात ?

A युजेनिक्स

B ऑर्नीथॉलॉजी

C ऑडेंटालॉजी

D ऑस्टीऑलॉजी
[15/04 9:15 PM] बाळराजे राठोड सर: C✅✅✅
[15/04 9:17 PM] बाळराजे राठोड सर: JP

जगातील पहिले व्हाईट टायगर पार्क भारतात कोणत्या राज्यात आहे?
[15/04 9:18 PM] बाळराजे राठोड सर: मध्यप्रदेश राज्यातील सन्ता जिल्ह्यात जगातील पहिले व्हाईट टायगर पार्क 4 एप्रिल पासून सुरु करण्यात आले.

No comments:

Post a Comment